Thursday, January 19, 2012

कलासक्ती

      नाटक पाहून घरी परतत होतो, बस ची वाट बघून बघून कंटाळून मग रिक्षा थांबवली.
"NNP चलोगे??"
      रिक्षावाल्याने meter down केला. रिक्षामध्ये बसल्यावर मस्त तंद्री लागते, मला फार आवडतं असं एकटंच बसून रस्त्यावर होणाऱ्या घडामोडी पाहायला. . .  असो. तर मी असाच बाहेर डोळे लावून बसलेलो आणि तितक्यात कोणीतरी कुकर चं झाकण नीट लावलं नाही कि जसा आवाज येतो तसा काहीसा आवाज येऊ लागला; पाहतो तर रिक्षावाला तोंडाने हवा मारत होता. मला हसू आलं पण मी ते आवरलं. त्याने वाटतं आरश्यातून मला हसताना हेरलं, त्याने स्पष्टीकरण दिलं-
"साहब, सिटी बजाना सिख रहा हु, सुबह से कोशिश कर रहा हु, पर ससुरी बजती हि नही..!!!"
      मी अगदी मोकळेपणाने बोललो, 'उसमे कौनसी बडी बात है'
" नहीं, वैसे नहीं पर कुछ हुनर तो होना चाहिए न?? दिन भर में करने के लिए "
      मग मी त्याला रीतसर अगदी सर्वात साधी सोप्पी [ जी मला जमते ती ;) ] शिटी शिकवायला लागलो. म्हणजे ओठांचा 'O' सारखा आकार करून, 'फिर जुबान थोडी नीची रखो और सांस बाहर छोडो' असा काहीसं तोडकं मोडकं प्रशिक्षण चाललेलं. मग त्याने प्रयत्न केला थोडी प्रगती होती, ती कुकर ची शिटी आता घसा बसलेल्या कोकिळेच्या वळणावर चाललेली . .
      थोडी रहदारी जास्त होती रस्त्यावर म्हणून घराकडची वाटचाल थोडी मंदावली होती खरी, पण मुंबईच्या ट्राफिक मध्ये रिक्षावाल्या सारखा सोबती नाही.
      काही केल्या त्याच्याने वाजत नाही म्हंटल्यावर कंटाळून तो म्हणाला,
"साहब, हर किसी में हुनर होता है, कोई गाता अच्छा है, कोई नाचता है, अपने में भी कुछ होना चाहिए ना, पर क्या करे हम पढ़े-लिखे नहीं है ना!! हमसे तो यह सीटी भी नहीं बजती"
मी चटकन बोललो, "पढाई लिखाई कहाँ से आई?? अगर आप में कुछ अच्छा है तो वो है..!! और यह सब फ़िज़ूल की बातों का कोई मतलब नहीं होता, आखिर आप पैसा कमा रहे हो वही काफी है "
      -पुढे कॉलनी आली, मी पैसे देऊन निघून गेलो.

            रात्री परत तेच आठवलं, सेकंद काट्याच्या ठेक्यावर आणि पंख्याच्या rhythm वर विचारचक्र सुरु झालं.
तो रिक्षावाला आठवला, असेल ३०-३२ वर्षांचा, अंगाने सशक्त होता, टापटीप. नुकताच लग्न झालेल्या पुरुषाची प्रौढता त्याच्या चेहऱ्यावर साफ झळकत होती. घर चालवण्यासाठी रिक्षा चालवत होता, पैसे कमवत होता मग 'त्याला' हि कलेची हुक्की का? कशासाठी??
            मग वाटलं, मी तरी काय वेगळा आहे??,
            आजवर मी दहांदा म्हंटलं असेल, 'मला टेनिस शिकायचंय, cartoonist बनायचंय, 'latest' म्हणावं तर photography शिकायची आहे'
            हां! मान्य, मला लहानपणापासून सवय कोणताही खेळ असो आपल्याला यायला हवा, आवड म्हणून का होईना; त्यातल्या त्यात football जरा चांगलं जमतं. मग तेच व्यसन जडलं. football ने खूप काही दिलं, पण जेव्हा घेतलं तेव्हा असं घेतलं कि रात्र नकोशी वाटायला लागली, मग मार्ग बदलायचं ठरवलं, स्वतःला शोभेल अशा 'frame' टिपण्यात गुंतलो, photography तशी 'safe'  जाणवली  (मला यातील खोलीची 'अजिबात' कल्पना नाहीये, toddler म्हटलंत तरी चालेल) म्हणून म्हंटलं आता इथेच थोडा वेळ तग धरावा -विरंगुळा म्हणून, आणि तसंही लिखाण तर आहेच. . मित्रांमध्ये कटिंग मारताना वडा-पाव बरोबर तिखट-गोड म्हणून शब्दांची जुळवा-जुळव तर चाललीच आहे, आणि ती चालेलच. . अगदी शेवटपर्यंत . .
पण आता मी इंजिनियरिंग चा विद्यार्थी, वरील एकाचाही माझ्या शिक्षणाशी काडीमात्र संबंध येत नाही इथे, मग मी काय करतोय इथे? बस्स 'Taking just Another jog in the Fairy Land Right ??'
            मग वाटतं हा सगळा पसारा कोणासाठी?? उत्तर आहे - स्वतःसाठी.
            पण का??. या 'का?' चं उत्तर मात्र दिवसागणिक बदलत असतं,
'कधी मनोरंजन म्हणून, कधी कोणाला हसवायचं म्हणून, कधी निव्वळ मज्जा म्हणून, कधी नुसताच टाईमपास तर कधी मनातला राग - लाज - Guilt - सगळं सगळं जे अगदी सहजा-सहजी Flush करता येत नाही ते कुठे तरी अधांतरी ठेवण्याकरिता - तात्पुरतं तरी.'
            यालाच कलासक्ती म्हणत असतील, बहुदा.
            ही कलासक्ती मात्र विलक्षण असते, अरसिकता कोळून प्यायलेली व्यक्ती सुद्धा काळाच्या ओघाने हिच्या आहारी जातेच. आणि प्रत्येकामध्ये आपल्यातील हे वेगळेपण जपण्याची चुणूक असते, पण यातूनही एखादाच असा अवलिया भेटतो जो स्वतःला झोकून द्यायला, प्रसंगी अग्निपरीक्षेसही छातीठोकपणे तयार असतो. 

After all,
'Everyone has talent. What's rare is the courage to follow it to the dark places where it leads.'    -Erica  Jong.

-वि. वि. तळवणेकर