सुख म्हणजे?
एक रम्य सकाळ. . .
अशी सकाळ, जिथे सकाळचा गजर व्हावा पण त्याला हि एका मधूर बासरीची तान असावी. .
किलकिल्या अर्धवट उघड्या डोळ्यातून सर्व काही शुभ्र असं वाटावं. .
बेडरूमच्या खिडकीतून वारयासोबत पडद्याशी लडिवाळ खेळ करत आत येणारी पिवळसर गोजिरी किरणं . . .
आह!! आणि त्या मागोमाग तू! भरजरी शालू नेसून एखाद्या मखमली मोरपिसाप्रमाणे अलगद पावलांनी यावं . .
इतकं अलगद कि तुझ्या शीतल स्पर्शाने फरशीलाही गुदगुल्या व्हाव्यात. .
तुझ्या पुढे तुरुतुरु चालणारी झुळूक तुझा सुगंध लेवून घरभर बागडावी, लग्नानंतर नवीनच घरात आलेली तू, तुझ्या चुडयाच्या कणकण आवाजाने घर मंत्रमुग्ध करून सोडवंस . . . .
तू, तुझा गंध, तुझी मी कामाला जावं म्हणून चाललेली चळवळ, तुझं असणं, आणि या सगळ्याने रेंगाळलेला मी. . .
लग्नासाठी काढलेली सुट्टी संपलीय, आज पासून कामावर रुजू.
हि सकाळ, इतरांना हेवा वाटेल इतकी सुंदर! इतकी रम्य!
म्हणजे काय सांगू आज हा क्षण मी कसा कसा मिरवणारेय ते… खासच सर्व. . .
हि सकाळ, हा क्षण, हा मी, हि तू, हे सुख, हे सर्व. . . . . अगदी जिवलग . . . अगदी तुझ्यासारखं.
-वि. वि. तळवणेकर
Waa chan chan..👌
ReplyDeleteThank you, Pranali :)
ReplyDelete