रॉनीने वाईन शॉप समोरच्या सिग्नलला गाडी उभी केली. सिद्धार्थने फक्त 'रोज का ना? ' एवढंच विचारलं नि दार उघडून निघाला. पाठून रॉनी काहीच बोलला नाही म्हणजे 'हो!' हे त्याला काही वेगळं सांगायला नको होतं.
ब्रिज वर बसून chill करणे हा सिड आणि रॉनी चा दर शनिवारचा बेत. आज रॉनी काहीसा वेगळ्याच मूड मध्ये होता, रॉनी ने ती माळ का घेतली? याचा सुगावा काही लागत नव्हता पण तो अगदी आनंदाने ती माळ त्याच्या हातात नाचवत होता. पण सिद्धार्थ काही बोलला नाही.
रात्र चढत गेली. हवेत गारवा होता पण इथे मात्र रॉनीचं मस्तक खणखणत होतं.
'साली लाईफ ची पण ना सरकार झालीय! काहीच कंट्रोल नाय आपला! पब मध्ये गेल्यावर जसं DJ जे वाजवेल त्याच्या बिट्स वर मुकाट्याने नाचायचं, ओला घसा कोरडा होईपर्यंत 'DJ SUCKS!' 'DJ SUCKS!' किंचाळलं तरी काहीही इकडचं तिकडे होत नाही आपल्याने.'
रॉनी समोर ये-जा करणाऱ्या गाड्या पाहण्यात गुंग होतं. तेवढ्यात खिडकीवर एक चिमुरडा येऊन थबकला. 'साब, खिलोना ले लो! साब!' 'पच्चीस का एक है साब'! त्याला पाहून रॉनीने नकारार्थी मान हलवली. तरी त्याची 'साब लेलो ना, ले लो ना' ची सरबत्ती चालूच होती.
रॉनी तुसडेपणाने हात भिरकावत खेकसला 'जा ना मेरे बाप. .' आणि म्हणता म्हणता मध्येच थांबला. कशाने तरी त्याचं लक्ष वेधून घेतलं. तो स्वतःशी थोडासा हसला आणि पोराच्या खेळण्याचा झोळीकडे बोट दाखवत म्हणाला, 'वो गुडिया देना. कितने की है?'
'पच्चीस रुपये. इम्पोटेड है साब.' पोर म्हणालं.
'हं..' करत रॉनीने dashboard वर ठेवलेले पैसे त्याला दिले. पोरगा गेला. सिद्धार्थ आत शिरला, बॉटल आत ठेवताना बाहुली पाहून चमकून गेला. 'आता हे काय नवीन?' रॉनी ने हसून पाहिलं आणि त्या बाहुलीच्या गळ्यात असलेली मण्यांची माळ काढून घेतली व ती किलकिल्या डोळ्यांची बाहुली तिथेच सिग्नलवर फेकून दिली. आणि गाडी ब्रिजकडे वळवली.
'हं..' करत रॉनीने dashboard वर ठेवलेले पैसे त्याला दिले. पोरगा गेला. सिद्धार्थ आत शिरला, बॉटल आत ठेवताना बाहुली पाहून चमकून गेला. 'आता हे काय नवीन?' रॉनी ने हसून पाहिलं आणि त्या बाहुलीच्या गळ्यात असलेली मण्यांची माळ काढून घेतली व ती किलकिल्या डोळ्यांची बाहुली तिथेच सिग्नलवर फेकून दिली. आणि गाडी ब्रिजकडे वळवली.
ब्रिज वर बसून chill करणे हा सिड आणि रॉनी चा दर शनिवारचा बेत. आज रॉनी काहीसा वेगळ्याच मूड मध्ये होता, रॉनी ने ती माळ का घेतली? याचा सुगावा काही लागत नव्हता पण तो अगदी आनंदाने ती माळ त्याच्या हातात नाचवत होता. पण सिद्धार्थ काही बोलला नाही.
रात्र चढत गेली. हवेत गारवा होता पण इथे मात्र रॉनीचं मस्तक खणखणत होतं.
'साली लाईफ ची पण ना सरकार झालीय! काहीच कंट्रोल नाय आपला! पब मध्ये गेल्यावर जसं DJ जे वाजवेल त्याच्या बिट्स वर मुकाट्याने नाचायचं, ओला घसा कोरडा होईपर्यंत 'DJ SUCKS!' 'DJ SUCKS!' किंचाळलं तरी काहीही इकडचं तिकडे होत नाही आपल्याने.'
सिद्धार्थ अनिमिष नजरेनं पाहत होता, तसं रॉनीच्या अशा बोलण्यात नवीन असं काहीच नव्हतं, दर वीक-एन्डला दोन बिअर डाऊन झाल्यावर बाटली उघडल्यावर जसा फेस फसफसत वर येतो तसा रॉनी नित्याने आठवड्याला आपला कोटा रिकामी करायचा. पण एरवी संथपणे वाहणारा प्रवाह आज एक निराळीच उसंत घेत होता, सिद्धार्थ एक गोष्ट उमजून होता, शब्द खेळतात लपंडाव पण डोळ्यांना मात्र शब्दच्छल जमत नसतो. म्हणून तो रॉनीच्या आडवा गेला नाही त्याला बोलू दिलं.
'काहीच नाही काय रे करू शकत आपण? आपली कुठेच नाही चालत काय रे? आपण आज असे 'vulnerable' कसे झालो रे? एके काळी मेहफिलीत उठणं बसणं असायचं आज हे असे इथे दर शनिवारी या सडक्या नाल्यावर ब्रिजला टेकून आपल्याच पैशाची दारू पिताना, मंदिरातल्या दानपेटीतून आठाणे उचलताना जशी फिलिंग यावी तसं काहीसं वाटतंय आज. . . '
रॉनीचं बोलणं ऐकता ऐकता सिद्धार्थचं लक्ष सहज त्याच्या फोनच्या वॉलपेपर कडे गेलं. फार जुना फोटो होता, गोव्याच्या रोडट्रिपचा. रॉनी, शेखर, नचिकेत सगळ्यांच्या हातात रंगीत ब्रेसलेट होते, दिसायला अगदी हुबेहूब आजच्या त्या माळेसारखी. सिद्धार्थचा गुंता सुटला, त्याच्या चेहऱ्यावर एक कठोर छबी उमटली. त्याने हातातली बिअर घट्ट आवळली.
'. .साला आपल्या पंटर लोकांची आठवण येतेय रे..' रॉनी बोलत होता, पण रॉनी पुढे काही बोलणार तोच सिद्धार्थ ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि चिअर्स म्हणून बॉटल उंचावली. . . रॉनीला बोलायचं होतं पण एका हातात माळ खेळवत त्याने पण बाटली उंचावली, 'चिअर्स!!'

थोडा वेळ असाच शांततेत गेला, रॉनी नाल्यात पडलेलं स्ट्रीट-लाईट चं प्रतिबिंब पाहत बसलेला. हातात ती माळ अजून हि होती. मधेच त्याला कसलीतरी चीड आली, त्याने मूठ घट्ट आवळली, हातातली माळ तुटली, माळेतले मणी रस्त्यावर विखुरले अंधारात दिसतही नव्हते कुठे गेले ते, वैतागून रॉनी ने उरलेली माळ हि भिरकावून दिली. सिद्धार्थ काण्या डोळ्याने सर्व पाहत होता, मधेच कोणाचा तरी मेसेज आला म्हणून त्याने फोन खिशातून काढला आणि परत ठेवला. आपली उरली सुरली बिअर संपवली व रिकामी बॉटल नाल्यात भिरकावून दिली.
सिद्धार्थने मागे वळून पाहिलं. रॉनी जमिनीवर पाय पसरवून बसलेला. रॉनी जोरजोरात गात होता 'यारों दोस्ती बड़ी ही हसीन . . है . . ये न हो तो. .' सिद्धार्थने त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहिले.
रॉनी ने डोळे वर करून सिद्धार्थ कडे पाहिलं. सिद्धार्थ मागे फिरला, रॉनीला खांद्याने धरून उभा करून घट्ट मिठी मारली नि गाडीत नेऊन पॅसेंजर सीटवर बसवलं. मग तो रॉनीचं पाकिट आणि फोन घ्यायला ब्रिजवर परतला. फोनच्या लाईटच्या उजेडात त्याने बसल्या जागी पाडलेला फोन खिशात ठेवला, एका हातात पाकीट घेतलं व निघता निघता राहिलेली बाटली लाथेने नाल्यात लवंडली आणि परत गाडीत येऊन बसला.
सिद्धार्थच्या डोक्यात रॉनीचे शब्द व त्याचा तो विखुरलेला चेहरा गुंजन करत होते. त्याने रॉनीच्या नजरेस नजर मिळवायचा मोह टाळला कारण; सिद्धार्थ जाणून होता रॉनीला कसलं दुखः खात होतं ते. रॉनी गर्दीत रमणारा, मस्त-मौला, मित्र म्हंटला कि त्याचा जीव कि प्राण, त्याच्या priority लिस्ट वर मित्र नेहमी अव्वल क्रमांकावर असत. तो प्रेमात बेजार होणार्यांपैकी तर कधीच नव्हता. पण मित्रांसाठी येडा होता साला! ज्यांनी दगा दिला आजही त्यांच्याच नावाची माळ जपत होता.

'बघ तुझं दुखः मी जाणतो, मला ठाऊक आहे तुला मघाशी काय बोलायचं होतं ते, शेवटी तू आणि मी काही वेगळी नव्हे, एकाच माळेचे मणी आपण. जे काही झालं त्याची झळ मलाही सोसावी लागली नाही का?' सिद्धार्थ सरळ शब्दात म्हणाला, त्यांच्यात 'एक सांगू का?' 'राग नाही ना येणार' असले सोपस्कार नव्हते. सिद्धार्थ बोलत होता नि रॉनी ऐकत होता.
'साला सच बोलू तो दोस्ती यारी मे पैसा आ जाये ना तर सगळ्याचीच गोची होऊन जाते रे.. चुकलोच आपण . . पण आता आणखी नाही सडायचं. . का म्हणून सारखी तीच माळ तेच मणी आणि तेच धागे दोरे कवटाळून बसायचं?....'
रॉनी ने खिडकीबाहेर नजर वळवली, त्याच्या डोळ्यात कैफ नव्हती तर स्थैर्य होतं आणि तो हे हि जाणून होतं कि सिद्धार्थ नशेत येऊन बोलत नव्हता.
'आपण ना माणसं जोडायची, आठवणी जमवायच्या, त्यांची माळ गुंफायला तो बसलाय कि वर..'
रॉनी ने सिद्धार्थ कडे वळून पाहिलं आणि हसला.

'काय झालं?' सिद्धार्थच्या कपाळावर प्रश्नचिन्ह होतं.
रॉनी गाडीची चावी फिरवत म्हणाला, 'चल निघूया आता. .'
-वि. वि. तळवणेकर.