दि. - ०३.१२.१२
आज खूपच उशीर झालाय डायरी लिहायला, खरं पाहावं तर उद्याचा दिवस सुरु झालाय. एकीकडे रितू रुसून फुगून शेवटी खिडकीकडे तोंड करून निजलीय, पिल्लू त्याच्या मित्रपरिवारात नव्याने सामील झालेल्या सुपरमनशी गोड मिठी मारून निवांत झोपी गेलंय. बेड लगतच्या टेबलवरील घड्याळ जरी एखाद्या आळसावलेल्या माणसाप्रमाणे दोन्ही हात ताणून जांभया देत रात्रीचे १.५० झालेत म्हणून सांगतंय तरीही इतक्या वर्षांचा रुटिन तो कसा मोडायचा. म्हणून आजही बसलोच. (थोडासा पसारा हि आहे डोक्यात तो आवरूया म्हणतो) असो!
आज शेवटी उशीर व्हायचा तो झालाच. कसाबसा घरी परतलो. काही मंडळी गेट वरच भेटली.
दारात रितू भयंकर चिडली होती, तिने नजरेनेच सिंहगर्जना केली. मी पिल्लू कडे पाहिलं, ते फार दमलेलं पण मला पाहून पळत पळत जवळ आलं. मी त्याच्या गालाचा मुका घ्यायला खाली वाकलो तर त्याने माझ्या हातातला सुपरमन हिसकावून घेतला व त्याला घेऊन घरभर बागडत होता.
मला त्या क्षणी अगदी ओकबोकं वाटत होतं. ते म्हणतात ना guilty conscious तसं वाटत होतं. रितू लालेबुंद डोळ्यांनी आग ओकत होती. भरा-भरा कार्यक्रम आटपला. आणि ज्या क्षणी शेवटच्या पाहुण्यांनी दाराबाहेर पाउल टाकलं, हिने धाडकन दार आपटलं आणि तडक किचन मध्ये शिरली. भांड्यांची कडाडून घोषणाबाजी सुरु होती.
मी मौन पाळायचं धोरण पत्करलं. कुठल्या तोंडाने बोलणार? पिल्लू चा दुसरा बर्थडे, तयारी पासून मदत करेन म्हणालेलो. किमान मेणबत्त्या फुंकायला पण नाही आलो. काहीतरी पर्याय शोधायला हवा. टेबल लॅम्प च्या लाईट वरून हि वणवा पेटून उठेल आज तर. त्या आधी झोपेचा पवित्र घेतलेला परवडला.
तहाच्या प्रस्तावाचा विचार उद्या. गुड नाईट (कप्पाळ!!)
दि. - ०४.१२.१२
ऑफिस मध्ये सगळ्यांचे सल्ले घेतले. काव्या मॅडम, सोनाली मॅडम कधी ट्रबलशूटिंग ला इतकी कप्पाळ फुटी करतील तर भलं होईल सगळ्यांचं. पण असो त्यांचा उत्साह काबिल-ए-तारीफ होता. सोनाली मॅडम कदाचित आपल्याच सुप्त इच्छांची फाईल उघडून बसलेल्या, रोमांटिक डिनर काय, थायलंड ला विकेंड काय, डायमंड सेट काय.
आशिष कडे कॉफी मागवली तर तो कप टेबलावर ठेवत "बुके!! सर बुके द्या!"
मी सगळ्यांचं ऐकलं, पण काहीच पटलं नाही.
घरी आलो. कर्फ्यू असल्या सारखं वाटत होतं.
फ्रीज, बाथरूम, डायनिंग टेबल, टीवी, सगळीकडे कागदी नोटीसा होत्या.
Red marker! Red Alert!
दि. - ०५.१२.१२
आज रात्री ८ ला आलो. सरळ सह परिवार सासर ला गेलो.
तिथे संधी साधून बाबांना काही सुचतंय का ते पहिल, ते हि निरुत्तर.
दि. - ०६.१२.१२
आज काही नाही. आणखी एक दिवस. तोच चार चिठ्ठ्यांचा खेळ. झोप नाही येत म्हणून डायरी चाळून काढली. आह!! गॉट इट!!
(चला गुड नाईट)
दि. - ०७.१२.१२
ब्लँक फ्रायडे. कधी रविवार येतोय असं झालंय. लिहायला असं काही नाही. आजही जुन्या डायरया वाचून काढल्या.
दि. - ०८.१२.१२
आज पूर्ण दिवस सगळी कामं आटपली. संडे ला नो ऑफिस. उगाचच बुके नेला घरी. अनइम्प्रेस्ड. माहितच होतं.
दि. - ०९.१२.१२
सक्काळीच उठलो. ब्रेकफास्ट रेडी केला. विसरलेलो माझ्याच हातची चव. पिल्लू ला आंघोळ घातली. फ्रायडे ला घेतलेला शर्ट घातला. त्याचा फेवरेट येल्लो कलर!
रितू रेडी होऊनच बसलेली. सगळं काही पाहत.
मी गाडी काढली. रितू पिल्लू ला घेऊन मागे बसली. म्युझिक पण खास! दोन गाणी पिल्लूला आवडणारी तर एक रीतुच्या आवडीची गझल. पिवळसर किरणं रितू च्या चेहऱ्यावर किती डिवाईन दिसत होती. कोणती तरी एक गजल ऐकताना पिल्लू झोपी गेला.
त्याला तसं निवांत पाहून पहिल्यांदा रितू काहीतरी बोलली.
" कुकिंग मागे पडलीय, पण रोमान्स बरयापैकी आहे अजून "
मी आरश्यात एक झलक पाहिली, She smiled. Happily.
नॅशनल पार्क आलं. खूप खेळ खेळलो. प्राणी-पक्षी पाहिले. माकडांना चणे खायला घातले.
तिथून मग डॉमिनोज चा पिझ्झा. पिल्लू आवडीने खातो. म्हणून ते.
मग पेंटर्स हाउस. तिकडे पण एकच मज्जा. फक्त रंगांमध्ये बरबटलेले कपडे. आणि काय ते नव-नवीन अविष्कार!
घरी आलो तेव्हा झोप डोळ्यावर गिरक्या घालत होति. पण प्लान नुसार गोष्ट सांगायचं ठरलेलं. अर्ध्यावरच पिल्लू गार.रितू निवांत निजलेली. तिला तसा पाहून खूप सारया समाधानाची झुळूक अंगावरून गेल्याप्रमाणे झालं.
मी व्हिस्की चा पेग घेऊन बाल्कनीत जाउन उभा राहिलो खूप वेळ. एकच विचार!
काल पर्वा जर मागे वळून पाहिलं नसतं तर कळलंच नसतं. आता बायको शी जवळ जायच असेल तर...
Via पिल्लू. Noone else!

-वि. वि. तळवणेकर