'पुरुषाने स्वैराचार करावा पण स्त्रीने मात्र पंख गाळून उंबरठ्याशी झुरावं', हे कोणा महापुरुषाचे कथन? सून डॉक्टरीण हवी पण तिने घर सांभाळावं नाहीतर आमच्या घराण्याच्या दिवट्याची चार-चौघात शोभा होते. मुलगी हवी पण का? तर वंशाचा दिवा फुलवणारे यंत्र म्हणून.
मुलाचं प्रेमप्रकरण तरुणाईतील चूकभूल समजून माफ केलं जातं, पण त्याच परिस्थितीत मुलीच्या माथ्यावर अक्षम्य पापाचा ठपका का म्हणून? तिच्या कसोटीत सेकंड इनिंग नसतेच मुळी, पण जर मिळालीच संधी तर तिच्या पदरी येतो तो नेमका 'फोलो-ऑन'!
रात्री चाळीतून शतपावलीस निघा, अथवा काही वेळ बाल्कनीत उभे राहा किंवा सोसायटीच्या गेटपाशी रेंगाळत राहा, हमखास कोणत्या ना कोणत्या खिडकीतून भांडी खणाणण्याचा आवाज येईल. त्या मागोमाग 'पांढऱ्या पायाची', 'अपशकुनी', 'नाटमोडी', 'वांजोटी', 'काळतोंडी' असला काय काय जाप होत असेल; अगदी शिव्यांचा शब्दकोश उघडला तर त्यातही स्त्रीचा यथेच्छ उद्धार केलेला असतो. पुरुष सहसा नामोहरम होताना कुठेच आढळणार नाही. 'बापचोद' बोलणारा आजवर तरी कोणी भेटला नाही!

तिला प्रत्येक गोष्टीवर बंधनं असावीत?
मुलाने शिकावे, चांगलं settle व्हावे, आणि मग लग्न करावे.
पण मुलीने १५वी करावी, त्यानंतर २ वर्षे काय तो खेळ-खंडोबा मांडावा आणि चढावं लग्नाच्या बोहल्यावर. तिच्या जगण्याचा परीघ इतका नेमका का असावा? तिला तिच्या वर्तुळाची त्रिज्या का न आखता यावी? हे फेरे म्हणजेच का तिचं वर्तुळ? तिने एवढ्यातच घुसमटत जगावं?
तिला तिची स्वप्न जगवायची संधी का न मिळावी? का इतरांनी लादलेल्या स्वप्नांची पूर्तता करत तिने दिवस काढावेत? जो तो येतो आणि आपल्या स्वप्नांचं ओझं तिच्यावर लादतो, आणि ती मुकाट्याने ते वाहून नेते. बापाला कन्यादानाचं पुण्य लाभावं म्हणून मनातून इच्छा नसतानाही ती लग्नास तयार होते, आईजवळ या विषयावर ब्र सुद्धा काढत नाही 'का?' तर, तिच्या पति विरोधात तिला जावं लागू नये म्हणून; करिअर दोघांचंही महत्वाचं, दोघाही तितकेच महत्वकांक्षी, पण निव्वळ बाळाला मातेचं वात्सल्य मिळावं या एका अटीवर ती आयुष्यभर आपला स्वार्थ पाठीशी घालते इतर अनेक इष्ट-अनिष्ट तृटींप्रमाणे.
अशा अनेक परिस्थिती ओढवतात जेव्हा अगदी पोरकं असल्यागत वाटतं, अगदी मेल्याहुन मेल्यासारखं होतं. पण ज्याला त्याला ती मदतीसाठी ओ देते तो प्रत्येकजण तिची आणखी मुस्कट दाबी करतो; अगदी तिची सख्खी आई सुद्धा म्हणते कि, 'अगं, स्त्री चं जिणं हे दिव्याच्या वातीसारखं, जळून राख व्हावं पण ते हि इतरांना प्रकाश देण्यासाठी.'
मुलगी म्हणजे परकं धन अशी काहीशी समजूत धरून एखाद्या पाळीव पशु प्रमाणे वागणूक देतात. इतकंच जड जात होतं तर जन्मतःच का नाही नरड्याला नख लावून सोक्षमोक्ष लावलात? हे असं उभं आयुष्य पावलो-पावली गळचेपी करण्यापेक्षा!
यात पाहिलं तर आपण सर्वच गुन्हेगार आहोत. तुम्ही, मी, सर्वच! अगदी तो मर्यादापुरुषोत्तम राम! तो हि यास अपवाद नाही. जेव्हा अग्निपरीक्षेच्या प्रसंगी माता जानकीला जननी ने सामावून घेतलं, तेव्हा राम हि मातीस मिळाला.
कुणास ठाऊक तिचा श्यामनिळा कुठे गुडूप झालाय!
दोष द्यायला कित्येक अपराधी सापडतात पण शेवटी शिक्षा मात्र ती एकटीच भोगते. स्त्री म्हणजे साक्षात निर्माती, तिचं अस्तित्व, तिचं जीवंतपण म्हणजे साऱ्या जगताचा श्वास, पण मग जेव्हा तिचा श्वास कोंडला जातो तेव्हा तो शव-वास तिने एकटीने का म्हणून भोगावा?

-वि. वि. तळवणेकर
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteit's really ahsum !!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteस्त्री-जन्मा तुझी कहाणी...Beautifully written vishal...khoop mojkya shabdat khup sundar vishay mandlay... Kp it up :)
ReplyDeleteahhsomm maannn..
ReplyDeletehatss off....... !!!!