Sunday, April 14, 2013

दावं


स्वैर हे शब्द,
स्वैर पण स्तब्ध,
अंतरी कल्लोळ,
सांगता येईना,
जिव्हा हि निशब्द

लवणारी पात,
राक्षसी जात,
सोडता येईना,
गर्दीची साथ

हवाबंद निवास,
मंद हा प्रकाश,
पाहता येईना,
मृगयेचा सुवास

उरीच्या साधना,
उरीच्या वासना,
सांधता येईना,
माझिया मना

ठेवितो नाव,
बंधिस्त जमाव,
चालता येईना,
तोडूनी दावं

-वि. वि. तळवणेकर

4 comments:

  1. Nice yar..chhan zaliye
    लवणारी पात,
    राक्षसी जात,
    सोडता येईना,
    गर्दीची साथ _/\_ _/\_

    ReplyDelete