रात्रीचे २ वाजलेत, आज झोप नाही लागत, आज नाही वाटत स्वप्नाच्या दुनियेत जाउन फेरफटका मारून यावा असं.
आज नजरेसमोर फक्त तू आहेस. पार्कात बसलेला. एकटाच. शर्टाच्या खिशात एक बॉल-पेन जे वाटत नाही घरी आलेल्या कुरिअर वाल्याला पार्सल मिळाल्याच्या सहीसाठी सोडून इतर कुठे तू वापरत असशील. आणि एक फोनबुक ज्यात नवनवीन नावांची नोंद होणं केव्हाच थांबलं असेल. हातात शेंगदाण्याची पुडी. किती वेळ होऊन गेला, पार्कातल्या सावल्यांची लांबी बदलली पण तुझ्या चेहऱ्यावरचे भाव नाही. ते तसेच, मुर्त! तुझं लक्ष होतं कि नाही काय ठाऊक. पण तुझ्या त्या चण्याची गोडी त्या पाखरांना काही रास नाही. त्यांना हि काहीतरी नवीन हवंय.
तू मला आणि मी तुला अगदी अनोळखी. माझं या पार्कात येणं हि प्रथमच, तू हि पहिल्यांदा आलास कि कोण जाणे पण एकंदरच तुझ्याकडे पाहता दर आठ-एक महिन्यांनी अगदीच झिजल्या म्हणून बदलणाऱ्या चपला खेरीज तुझ्या दिनचर्येत उभ्या आयुष्यात काही बदल घडला असेल असं वाटत नाही. पण एक सांगू? मला माहितीये तू दुर्लक्ष करशील, तरीही ऐक; तुझ्या चेहऱ्यावर जो भाव होता ना तो पाहिला आणि जवळचा वाटलास तू, अगदी खास पंटर असतो ना? तसा.
तुझी हि नजरभेट खूप मागे घेऊन गेली मला, काही चेहरे-मोहरे धावून गेले डोळ्यासमोरून, अगदी तसेच जशी ती फास्ट लोकल जाते तुझ्या त्या स्लो-ट्रेन च्या फलाटावरून. ते हि तुझ्या सारखेच होते, त्यांना हि हे सररास जमायचं, मला कालयात्रा घडवून आणायची. परत एकदा तसंच वाटतंय, त्यातलाच कोणीतरी परत आलाय, तुझ्या पॉलीसीच्या हफ्त्यासारखा.
तुला पाहिलं आणि परत किती लहान आहे मी त्याची प्रचीती आली. थोडीशी चीटिंग करत का होईना मी जगतोय. कधी सिक लिव्ह (Sick Leave) घेऊन काश्मिर तर कधी केरळ भटकून येतो. फार स्वप्नवत आहे ते जग! आणि असली अनेक स्वप्न मी जगतो आणि जी जगता येत नाहीत ती पहाटेच्या साखरझोपेत पाहतो! हेहे! हसायला येतं या वेडेपणावर पण तेवढंच समाधान. पण आज तू नकळत तमाझ्या भोवतीच्या या फुग्याला टाचणी मारलीस (तुझ्या वाढदिवसाला तरी फोडलेलास का रे फुगा?). एकीकडे माझी चाललेली हि समाधानापोटीची धावपळ आणि एकीकडे तू! समाधानाची झोप हि मिळाल्या किती तप मागे पडली असतील कोण जाणे. या असल्या रहाटगाड्यात स्वप्नांसाठी वाव तरी कुठे? पण साला तरी तू जगतोस!
कॉलेजच्या पटांगणात बसून दारू पिणारे आम्ही, ऑफिसला दांडी मारून वन-डे बघायला जाणारे आम्ही, मनात येयील तेव्हा गड-किल्ले पाहायला भरारी घेणारे आम्ही, वाटायचा 'मॅडनेस' काय तो आम्हीच केला. पण खरं सांगू? या सगळ्यात सर्वात 'मॅड' कोण असेल तर तो तू!!
हे वर्षानुवर्षे असलं Mechanical जगणं, आमच्याने नाही जमायचं. अरे मशीन पण काही महिन्यांनी कारर-कुर्र करायला लागते, आणि तू हु कि चू न करता तसाच जगतो! रात्री सगळे झोपल्यावर अंधारात दिवाणखान्यातून स्वयंपाकघरात जायला पण पाय चाचपडतात माझे आणि तू असं स्वतःला या अनंत अंधारात बिनधास्त उडी घेतोस! साल्या! डेअरडेविल आहेस तू! जिगरबाज!
तुला कधी कोणी सांगितलं असेल कि नाही ठाऊक नाही पण मी सांगतो, वाघाच्या छातीचा आहेस तू! तुझ्यातली प्रखरता नाही माझ्यात, असला मॅडनेस नाही व्हायचा माझ्याने, त्या साठी जी छाती लागते ती हि नाही माझ्यात, नाहीतर दोस्ता!! तडख आलो असतो तुझ्यासमोर, तुला घट्ट मिठी मारून तुझ्या ओजस्वी पंखांची भिक मागितली असती, शरण आलो असतो तुला.
पण मी शुद्र आहे, माझ्याकडे माझी साखरझोप आहे, माझी स्वप्नं, माझं तत्वज्ञान आहे, माझ्यात खोटी समजूत घालण्याची लकब आहे! मी शर्यतीत उभा आहे, मला जिंकता आलं नाही तरी मला माझा पराभव दडवता येतो. तू या शर्यती पासून फार अलिप्त. तरीही मित्रा, जिंकलंस!

-असाच एक, तुझी बरोबरी करण्याची ऐपत नसलेला
Konasathii ??? Neeed to talk about this.....felt very emotional
ReplyDeleteCan't say for sure, for whom it is. . from whom it is. . many faces come to mind.
Deleteaani khoop bhariii vatla ki itke bhidla he tula, thanks ekdum dil se :) :) :)
Delete