Tuesday, June 17, 2014

निखारा



काही मनं अकल्पित अशा दुखःचा निखारा जपत असतात, वेळेनुरूप त्यावर राख जमा होते, तोच कोणी नकळत पणे फुंकर मारून जातो वा अशीच एक झुळूक त्यावरून जाते, आणि तो लालेबुंद निखारा उघड्यावर पडतो, बहुतेकांच्या नजरेतून तो निसटतो पण आपल्या नजरेस ते येतं, नि क्षणभरासाठी का होईना पण एक चटका बसतो, वाटतं पुढाकार घ्यावा, मनात शिरकाव करून त्यावर पाणी शिंतडावं, पण आपल्याला ते नाही जमत. तो दाह इतका ज्वलंत असतो कि आपल्याला आवरतं घ्यावंच लागतं. .
कारण तो निखारा विझवायला एकतर मूळतः राख  झालेलं अथवा पाण्या प्रमाणे निर्मळ असं मन असावं लागतं.

-वि. वि. तळवणेकर

No comments:

Post a Comment