Saturday, February 25, 2017

०१

"ते काय आहे?", ताईने पुस्तकातून डोकं बाहेर काढत विचारलं.
"I am quitting." अनय हात उडवत म्हणाला.
"okay?" तिने त्याच्याकडे सबबीप्रित्यर्थ कटाक्ष टाकला.
त्याने खांदे झटकले.
ताईने पुस्तक बाजूला ठेवलं व उठून सरळ बसली. खिडकीतून रस्त्यावरचा गोंगाट आत येत होता.
त्याला तो गोंगाट सहन होईना. त्याने खिडकी बंद केली. ताई स्तब्ध बसून होती. खोलीत फक्त पंख्याच्या वाऱ्याने पुस्तकाची पाने मागे मागे जात होती.
"हं! तू quit करतोयस, आणि??" ताईने बसल्या जागी विचारलं.
"आणि काय. . एक महिन्याच्या नोटीस वर आहे." अनय सरळ आतल्या खोलीत शिरला.
"ते नोटीस केलं रे. . मूळ मुद्दा सांग." ताई चढ्या आवाजात म्हणाली.
"मुद्दा वगैरे काही नाही. करिअर जम्प घेतोय." त्याने आतूनच आणखी एक लेटर समोर केलं.
ऑफर लेटर होतं ते. कोणा एका दूर गावच्या कंपनीचं.
"काय आहे हे म्हणालास?"
"जम्प! पॅकेज मध्ये पण आणि पोस्ट मध्ये पण!"
ती ताडकन उठली नि आतल्या खोलीत शिरली व त्याला कोपराने हिसकावून समोर उभं केलं.
"जम्प??" तिने तिडीकीने विचारलं.
"हो जम्प" तो तिच्या रोखाने म्हणाला.
"अनय!! अरे सुसाईड आहे ही! कंप्लिटलीss प्रोफेशनलss सुसाईडss म्हणतात याला!!!" ताई त्याच्यावर कडाडत होती.
"ताई काय म्हणतेय तू?" त्याने उडवाउडवीच्या स्वरात म्हटलं.
"तुला चांगलं ठाऊक आहे अनय की मी काय म्हणतेय ते"
"You are unnecessarily complicating it!" त्याने हात सोडवत म्हटलं.
"मी कॉम्प्लिकेट करतेय? अरे प्रत्येक गोष्टीचा अवाजवी अर्थ लावत फिरणारा तू!! आणि गोष्टी मी कॉम्प्लिकेट करतेय?? हा??"
"मला नाही बोलायचं काही, माझं ठरलंय, मी चाललोय."
अनय तिला बाजूला करत किचन मध्ये शिरला.
"मी नाही देणार जाऊ तुला! not untill you tell me why?" ती त्याच्या पाठमोऱ्या अंगावर पुन्हा एकदा खेकसली.
ती तशीच तिथे स्तब्ध उभी होती. आतून फक्त भांड्यांची उचल ठेव करण्याचा आवाज येत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो फोन घ्यायला बाहेर आला व पुन्हा आत गेला. पुन्हा तीच उचल-ठेव. इकडे खिडकीबाहेर दाटलेल्या ढगांचा अंधार आता खोलीत शिरत होता.
ताई निमूटपणे जाऊन डायनिंग टेबल पाशी जाऊन बसली. तो दोघांसाठी जेवण घेऊन आला. पुढचा अर्धा तास मुकाट्याने गेला.
जेवणानंतर तो खिडकीपाशी उभा राहून रस्त्यावरची वर्दळ पाहत होता. बाहेर पाऊस चांगला तासभर पडून थांबला होता. पण इकडे चाललेला गडगडाट अजून काही निवळला नव्हता.
ती दुधाचा कप घेऊन खिडकीपाशी आली. काही न बोलता तशीच निमूटपणे उभी राहिली. त्याने एक नजर तिला पाहिलं मग पुन्हा बाहेर उंचावर काहीतरी शोधत तसाच उभा राहिला. कदाचित शब्द सापडत नसावेत.
खूप वेळ जुळवाजुळव करून शेवटी त्यानेच विषयाला हात घातला,
"तुला सगळं ठाऊक तर आहे, आणखी काय सांगू नव्याने?"
"कारण नव्याने काहीतरी घडलंय, होय ना?"
"नवीन नाही गं.
तेच ते. तेच सारं. .
त्याच गप्पा, तीच गाणी,
तोच रस्ता, तेच वळण,
तोच पाऊस, तीच आठवण,
तेच भिजणं, तेच हसणं,
तेच तिचं साऱ्यात असणं . . "

". . Oh Come on Anay! stop that! you are as bad a poet as you are at making decisions!!" ताई त्याला मध्येच तोडत म्हणाली.
"मी पूर्ण कंट्रोल मध्ये आहे."
"खाक कंट्रोल!! अरे लाईफ आहे रे, गाडी थोडीच कि तू कंट्रोल मध्ये ठेवणार?
अरे सुटतो ताबा, होतात चुका. shit happens !! आता आयुष्यभर भोगणार काय?"
"मला तरी हेच solution दिसतंय"
"तुला वाटतं हे solution आहे? तुला वाटतं हे असं शहर सोडून गेलास कि सगळे धागे दोरे सरळ होणार?"
त्याच्या चेहऱ्यावर खोचक हसू फुटलं. गेली किती एक वर्ष हा प्रश्न त्याची सोबत करून होता, पण त्याने उत्तर ना देणं पसंत केलं.

'बेवक़्त बरसते बादल
खिड़की में बैठे परिंदों को भिगोने का फ़न ख़ूब जानते है।

तुला वाटतंय तू हे शहर सोडलंस कि तिचा पिच्छा सुटेल . .
तुला कळणारही नाही आणि कधी साहिर ची एखादी गझल
तुझ्या खिडक्या सताड खोलून आत घुसखोरी करेल,
तू ऑफिस मध्ये किबोर्ड वर बटणं खटखटवत असताना
तिच्या आवडीचं गीत अगदी चोर पावलांनी येऊन तुझ्या ओठांना बिलगून जाईल,
तू त्या पासून लांब पळायचं म्हणून गाडी काढशील,
हायवेला भरधाव सुटशील,
पण सिग्नल पाशी आल्यावर
त्या चिमुरडीने दिलेली दस्तक तुला घायाळ करेल,
तिच्या हातातली लिली तू अनिमिष नजरेने पाहत राहशील,
त्या बंद खिडकीतून ती हळूवारपणे आत शिरेल,
मग
ती,
तिची आठवण,
तिचं शहर,
सर्व काही तू हात फैलावत सामावून घेशील.

जानी...
ये ऐसा शहर हैं, जहाँ हर घाँव नीला है,
कुरेद कर न देखो, यहाँ हर जख़्म गीला है।'

"AND THATTT SWEETHEART?? WAS POETICC!!!" तिने जुगलबंदी जिंकल्याच्या आवेशात हात उंचावले.
"OHH! SHUT UPP! that sucked too!" असं म्हणत त्याने खोडकरपणे उशी भिरकावली व सरळ बेडरूम मध्ये गेला.
". . आणि तू रिजाईन नाही करत आहेस! अनय!!!!. . . ." तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने खाडकन दार ओढून घेतलं.

बेड वर पडल्या पडल्या त्याचं काळीज जोरजोराने धडधडायला लागलं. पूर्ण दिवसात पहिल्यांदाच घेतलेल्या निर्णयाच्या गहराईचा थांग त्याने घेतला. तिच्या सोबतचा क्षण अन क्षण त्याच्या भोवती घिरट्या घालू लागला.
कुठेतरी ताईचं बोलणं योग्यच होतं.
पण शेवटी तो ही हट्टाला पेटलेला. त्याच्या नजरेत हीच पळवाट रास्त होती.

'मेरा दौड़ना जायज हैं,
राहत मिलती हैं,
गली मोहल्ले से. .
उन्हें पिछा करते देख।'

क्रमशः

-विशाल तळवणेकर 

No comments:

Post a Comment